Daund Pune Crime News | पुणे : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील प्लॅस्टिकच्या बरणीत 6 ते 7 मृत अर्भक आढळली; घटनेने परिसरात प्रचंड खळबळ
पुणे / दौंड : Daund Pune Crime News | शहरालगत असणाऱ्या बोरावके नगरमध्ये कचऱ्याच्या ढिगार्यात सहा ते सात अर्भक आढळून आले आहे. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान दौंड पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे. डॉक्टरांचे वैद्यकीय पथकही उपस्थित झाले आहे. नेमके हे अर्भक कोणत्या रुग्णालयाने फेकून दिले आहेत, याचा तपास पोलिस करीत आहेत.
शहरालगत असणाऱ्या बोरावके नगरमध्ये प्राईम टाऊनच्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगार्यात ही अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आले आहेत. प्रथमदर्शनी ही अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का? या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत.
हे अर्भक आणि काही मानवी शरीराचे अवशेष सीलबंद भरणीत भरलेले असून त्यावरती त्या संदर्भातील माहिती देखील आहे आणि ते २०२० मधील आहेत, अशी माहिती मिळत आहे. मात्र हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये कसे आले याचा शोध घेतला जात आहे.
