DCP Transfer In Pune-Pimpri Chinchwad | पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत आणि सागर कवडे यांची पुणे शहर पोलीस दलात नियुक्ती; बसवराज तेली, गणेश इंगळे प्रदीप जाधव पिंपरी चिंचवड पोलीस दलात
पुणे : DCP Transfer In Pune-Pimpri Chinchwad | राज्य शासनाने पुणे शहर पोलीस दलात २ परिमंडळ आणि ५ पोलीस ठाण्यांची निर्मितीची घोषणा करतानाच नवीन २ पोलीस उपायुक्तांची नियुक्ती पुणे शहर पोलीस दलात केली आहे. त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस दलात एक अपर पोलीस आयुक्त आणि २ पोलीस उपायुक्तांची नियुक्ती केली आहे.
राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक ७ दौंड येथील समादेशक चिलुमुला रजनीकांत यांची तसेच सागर कवडे यांची पोलीस उपायुक्त म्हणून पुणे शहर पोलीस दलात नियुक्ती केली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांची पिंपरी चिंचवड अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांची तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती चे पोलीस अधीक्षक प्रदीप जाधव यांची पोलीस उपायुक्त म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस दलात नियुक्ती केली आहे.
