Death Threat To Mahesh Landge | भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

भोसरी : Death Threat To Mahesh Landge | भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांची सुपारी मिळाल्याचे सांगत लांडगे यांना दिली जीवे मारण्याची धमकी दिली.
मोशी मधील तरुणाला या संदर्भात ताब्यात घेण्यात आले आहे. उदय कुमार राय असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये (Bhosari MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उदय कुमारने फोन करून महेश लांडगे यांची सुपारी मला मिळालेली आहे. अशी माहिती फोनद्वारे दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि अवघ्या काही तासांत उदयकुमार रायला ताब्यात घेतले आहे.
उदयकुमार राय हा छत्तीसगडचा असून गेल्या पाच वर्षांपासून तो भोसरी मध्ये राहत आहे.
त्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
धमकी कोणत्या कारणावरून देण्यात आली हे अद्याप समजू शकले नाही.
याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Death Threat To Mahesh Landge)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी