Deccan Pune Crime News | पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे न घेतल्याने पत्रकारावर कोयत्याने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न

koyta

पुणे : Deccan Pune Crime News | पोलिसांत दिलेली तक्रार मागे न घेतल्याने तिघा जणांनी पत्रकारावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Attack On Journalist In Pune)

याबाबत राहुल अशोक बानगुडे (वय ४०, रा. भालेकर चाळ, एरंडवणा) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deecan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यश राजेश कंधारे Yash Rajesh Kandare (वय २२, रा. रतनदीप सोसायटी, पटवर्धन बागेजवळ, एरंडवणा), ओम राजेश कंधारे Om Rajesh Kandare (वय १८) आणि राजेश विठ्ठल कंधारे Rajesh Vitthal Kandare (वय ५०, रा. एरंडवणा) या तिघांवर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Attempt To Kill)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भालेकर वस्ती येथील गणेश मंदिराजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता फोनवर बोलत थांबले होते. त्यावेळी तेथे यश कंधारे आला. त्याने तू आमचे विरोधात दिलेली तक्रार मागे घेत नाही़ तुम्हाला मस्ती आली आहे काय, तुम्हाला राहायचे आहे की नाही, असे म्हणून तू पोलिसांची तक्रार करतो का माजला काय आमच्या नादी लागतो का असे म्हणून त्याने कोयता काढून फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Deccan Pune Crime News)

तेव्हा फिर्यादीने हातमध्ये घातला असता कोयता डाव्या हाताला लागला.
त्याचवेळी तेथे शंभु कंधारे, राजेश कंधारे गाडीवरुन आले. त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी, हाताने, काठीने, दगडाने मारहाण केली. फिर्यादी जखमी अवस्थेत तेथून पळून जाऊ लागले. तेव्हा राजेश याने गाडीवरुन पाठीमागून येऊन पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत पोलीस चौकीत गेलात तर तुला चैन चोरीचा खोटा गुन्हा दाखल करुन त्यात अडकवू असे म्हणून धमकी दिली आहे. डेक्कन पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक राऊत तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन