Deccan Pune Crime News | डेक्कन परिसरात पुन्हा ड्रँक अँड ड्राईव्ह ! रविवारी सकाळची घटना, व्हायरल व्हिडिओवरुन पोलिसांनी मद्यधुंद चालकाला घेतले ताब्यात
पुणे : Deccan Pune Crime News | रविवार सकाळी ९ वाजण्याची वेळ, कर्वे रोडवरुन (Karve Road) एका कार चालक उघडाबंब अवस्थेत गाडी चालवत होता. एका चाणाक्ष नागरिकांनी त्याचा व्हिडिओ काढून पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला. मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शांतता रॅली आज पुण्यात होणार असल्याचे सकाळपासूनच शहरात सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अपघातग्रस्त ही गाडी कर्वे रोडवरुन जात असताना पोलिसांनी सावरकर भवन (Savarkar Bhavan Pune) येथे तिला थांबविली. (Police Bandobast In Pune)
शुभम गुप्ता (Shubham Gupta) असे या कारचालकाचे नाव आहे. तो बोलण्याच्या स्थिती नव्हता. पोलिसांनी ही गाडी पाहिली असता तिने अगोदरच कोणत्याही ठिकाणी धडक दिल्याचे दिसून येत होते. तिच्या डाव्या बाजूचा बंपर चेमलेला दिसून येत होता. गाडीच्या काचेवर डॉक्टराचे चिन्ह आहे. (Drunk And Drive Case)
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीजा निंबाळकर (Sr PI Girija Nimbalkar) यांनी सांगितले की, या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होताच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ही गाडी पकडली. या तरुणाला मेडिकलसाठी नेण्यात आले आहे. त्याने कोठे धडक दिली हे समजले नाही. कोणी फिर्यादी पुढे न आल्यास पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करणार आहेत. (Deccan Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी