Deccan Pune Crime News | धनतेरसच्या मुहूर्तावर चोरीला गेलेले मोबाईल मिळाले परत ! डेक्कन पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाकडून साडेपाच लाखांचे ३० मोबाईल हस्तगत

Deccan Police

पुणे : Deccan Pune Crime News | ‘‘आम्ही तर आता मोबाईल परत मिळेल, अशी आशा सोडली होती. आज धनतेरसच्या दिवशी आम्हाला आमचा मोबाईल परत मिळाला, हे आमचे भाग्य म्हणावे लागेल’’ मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी व्यक्त केलेली ही भावना पुरेशी बोलकी होती. (Mobile Theft Cases)

हरविलेल्या/ चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेऊन डेक्कन पोलीस ठाण्यातील (Deccan Police Station) सायबर विभागाने (Cyber Crime) ३० मोबाईल परत मिळविले. हे मोबाईल त्यांच्या मालकांना पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांच्या हस्ते धनतेरसच्या मुहूर्तावर परत करण्यात आले. यावेळी आपला चोरीला गेलेला मोबाईल पाहून मोबाईल मालकांना सुखद धक्का बसला. (Deccan Pune Crime News)

केंद्र शासनाच्या सीईआयआर प्रणालीचा वापर करुन डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस अंमलदार उमा पालवे, सरोजा देवर, सुप्रिया सोनवणे या पथकाने वेगवेगळ्या राज्यात तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हरविलेले मोबाईल चालू असल्याबाबत माहिती मिळाली होती. सायबर पथकाने या मोबाईलची माहिती संकलित करुन त्यानंतर मोबाईल फोन वापरकर्त्यांशी संपर्क साधला. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एका महिन्यांमध्ये नागरिकांचे ५ लाख ४० हजार रुपयांचे ३० मोबाईल हस्तगत केले. पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांच्या हस्ते या ३० नागरिकांकडे हे मोबाईल सुपूर्त करण्यात आले.

अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल,
सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या सुचनेनुसार
सायबर पथकाच्या महिला पोलीस अंमलदार उमा पालवे, सुप्रिया सोनवणे, सरोजा देवकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पान टपरीतील चोरीच्या संशयावरुन तीक्ष्ण हत्याराने मारहाण करुन तरुणाचा खून

Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात काँग्रेसची पुनरावृत्ती की विजय शिवतारे गड जिंकणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Nirbhay Bano Campaigns | ‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; मविआला सशर्त पाठिंबा; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”

Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडीतील पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग ! दोन टेम्पो, दोन दुचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी (Video)