Deenanath Mangeshkar Hospital Controversy | वाद पेटला! 20 लाखांची मागणी करणाऱ्या डॉक्टरचे खासगी क्लिनिक फोडलं, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड (Video)

Harshada Pharande

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणावरून भाजपही आक्रमक झाली आहे. ज्या डॉक्टरांनी २० लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. त्या डॉक्टरांचे खासगी क्लिनिक भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून फोडण्यात आले आहे. डॉक्टर सुकृत घैसास यांचे रुग्णालयाच्या पाठीमागेच खाजगी क्लिनिक आहे. या खाजगी क्लिनिकची महिला पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पुणे शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

https://www.instagram.com/p/DIBbfXwiYmY

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.या घटनेमुळे पुणेकर संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. या रुग्णालयाबाहेर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडूनही आंदोलन करण्यात आले. रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत निषेध करण्यात आला. युवक काँग्रेस तसेच पतित पावन संघटनेकडून रुग्णालयाच्या बोर्डला काळं फासत निषेध नोंदविण्यात आला. रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैसे न भरल्याने उपचार केले नाहीत. त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहे.