Deepak Mankar | पुणे: राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार पदासाठी दीपक मानकरांना संधी देण्याची मागणी
पुणे : Deepak Mankar | विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३ जागा मिळणार असल्याची माहिती आहे. त्यातील एका जागेवर पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदच्या आमदार पदी संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे (Datta Sagare) यांनी केली आहे. (Ajit Pawar NCP)
दत्ता सागरे म्हणाले, ” दीपक मानकर यांच्यासोबत मी गेली 35-40 वर्षांपासून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी आहे. त्यांच्याकडे कोणताही व्यक्ती त्याचे काम घेऊन आला तर काम पूर्ण झाल्याशिवाय परत जात नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत हॉस्पिटल मध्ये दाखल करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देणे, शासकीय कामांबाबत पाठपुरावा करून काम मार्गी लावणे अशी कामे ते करीत असतात. ते नेहमीच गरीब व होतकरू, गरजूंना वेळोवेळी मदत करत आले आहेत.
सध्या विधानपरिषदेच्या जागावाटपाबद्दल विविध माध्यमातून बातम्या ऐकु येत आहेत. पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर हे गेली 40 वर्षांपेक्षा जास्त सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी उपमहापौर, नगरसेवक, अध्यक्ष व सदस्य पुणे शिक्षण मंडळ अशा विविध पदांवर काम करीत असताना समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न ते सोडवत आहेत.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष म्हणून संघटनेसाठी केलेले काम, पक्षातर्फे आयोजित केलेले सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम, पुढील विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता दीपक मानकर यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाला पाठबळ मिळावे अशी पुण्यातील प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असल्याचे सांगत राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार पदासाठी मानकर यांचाच विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.
या 12 मध्ये भाजपला 6, शिंदे सेनेला 3, तर अजित पवार गटाला 3 जागा मिळणार असल्याची माहिती आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे ती मान्यतेसाठी पाठविली जाणार आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी