Dehu Raod Crime News | डॉक्टर पतीपत्नीने घातला ४१ लाखांना गंडा ! हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर, पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी पैसे घेऊन केली फसवणूक
पिंपरी : Dehu Raod Crime News | देहुरोड येथील हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टेअर, पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी पाच जणांकडून तब्बल ४१ लाख रुपये घेऊन पतीपत्नीने फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत विजय दत्तु महाडिक (वय ३४, रा. नवी सांगवी) यांनी देहुरोड पोलिसांकडे (Dehu Raod Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनीष नागेश डोईफोडे (Manish Nagesh Doifode) व पूजा मनीष डोईफोडे या पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, देहुरोड येथे सुभश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल (Subhasree Multi Specialty Hospital) आहे. डॉ. मनीष डोईफोडे हे त्याचे चालक आहेत. त्यांनी फिर्यादी व सतीश महाजन यांना सांगितले की, हे हॉस्पिटल ३६ बेडचे आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देत आहोत व मेन रोडपासून जवळ असल्याने खूप बिझनेस होणार आहे, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. सुभश्री हॉस्पिटल येथे मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच शुभम बाबुराव हरणे यांना मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी ११ लाख रुपये घेतले. (Dehu Raod Crime News)
त्याचप्रमाणे रोहन संतोष निंबळे यांना पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी ६ लाख,
प्रविण रोशन नवले यांना पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी १० लाख आणि सिद्धार्थ संजय बरळ
यांना मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये घेऊन एकूण ४१ लाख रुपये घेऊन पाच जणांची फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक सोळंके तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी