Dehu Raod Police News | दोघा चोरट्यांकडून साडेचौदा लाखांच्या 21 मोटारसायकली जप्त ! 7 पोलीस ठाण्यातील 21 गुन्हे उघडकीस, बीडमध्ये केली होती विक्री

Dehu Road Police

पिंपरी : Dehu Raod Police News | देहुरोड पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांनी चोरलेल्या २१ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या वर्षभरात त्यांनी ७ पोलीस ठाण्याच्या परिसरातून या मोटारसायकली चोरल्या होत्या. (Vehicle Theft Detection)

आकाश शंकर जाधव (वय २४, रा. चिखली, मुळ गाव कोळसुर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) आणि आशुतोष नानासाहेब घोडके (वय २३, रा. चिखली) अशी या चोरट्यांची नावे आहेत.

देहुरोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला चोरीची दुचाकी घेऊन काही जण देहुरोड बाजार परिसरातील स्वामी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्याअनुंशषाने पोलिसांनी सापळा लावला. दोघे जण ज्युपीटर स्कुटरवरुन आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडील दुचाकी देहुरोड येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीमध्ये त्यांनी अनेक मोटारसायकली चोरीची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी बीड जिल्ह्यातील नागझरी येथून १४ लाख ४५ हजार रुपयांच्या चोरीच्या २१ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

देहुरोड पोलीस ठाणे २, चिखली पोलीस ठाणे ७, भोसरी एमआयडीसी ३, निगडी पोलीस ठाणे ३,
भोसरी पोलीस ठाणे २, दिघी, चिंचवड व सिंहगड पोलीस ठाणे प्रत्येकी एक असे २१ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दोघाही आरोपींना ५ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ़ शशिकांत महावरकर,
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त देवीदास घेवारे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे,
पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे, अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार बाळाासहेब विधाते, सुनिल यादव,
प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, युवराज माने, शुभम बावनकर, कैलास उल्हारे, खंडु विरणक, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MVA CM Candidate Issue | शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाची मवाळ भूमिका; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला

Jaydeep Apte Arrest | शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक; जयदीप कसा पकडला गेला जाणून घ्या

Hadapsar Pune Crime News | अट्टल वाहनचोराकडून साडेबारा लाखांच्या तब्बल 24 दुचाकी हस्तगत; हडपसर पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

You may have missed