Dehu Raod Pune Crime News | बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन तडीपार भावाने तडीपार गुन्हेगाराचा केला खून

देहुरोडमधील खाणीत दिले ढकलून, शुक्रवार सकाळची घटना
पिंपरी : Dehu Raod Pune Crime News | बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन तडीपार भावाने (Tadipar Criminal) दुसर्या तडीपाराला खाणीत ढकलून देऊन खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना देहूरोड पोलीस ठाण्याजवळील (Dehu Road Police Station) ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याला असलेल्या खाणीत शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. (Dehu Road Murder Case)
अजय जोगिंदर लुक्कड (वय २१) असे खून झालेल्या तडीपार तरुणाचे नाव आहे. कुणाल चंदू सकट (वय १८) प्रेम सचिन मोरे (वय १९) आणि ओमकार ऊर्फ गणेश रवींद्र पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे (ACP Devidas Gheware) यांनी सांगितले की, अजय लुक्कड याला नुकतेच तडीपार करुन मुंबईला सोडण्यात आले होते. त्याच्या साडूची पत्नी वारली. तिच्या अंत्यसंस्कारासाठी तो देहुरोडला आला होता. कुणाल सकट यालाही तडीपार करण्यात आले आहे. अजय लुक्कड याचे कुणाल सकट याच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध होते. या कारणावरुन कुणाल हा अजयवर चिडून होता. कुणाल याने ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगरावर अजय याला बोलावून घेतले.
कुणाल व त्याचे दोन साथीदार तेथे अगोदर पोहचले. अजय आल्यावर त्यांच्यात वादावादी झाली.
तेव्हा तिघांनी अजय याला खाणीत ढकलून दिले. त्यानंतर कुणाल याने आपल्या बहिणीला कळविले. त्याच्या बहिणीने ही बाब अजयच्या आईला सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी कळविली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. देहुरोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अजय लुक्कड मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या गळ्यावर काही व्रण दिसून आले. अजय याच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. त्याचा मृत्यु नेमका कसा झाला हे शवविच्छेदनातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!