Dehu Road Crime News | इन्कम टॅक्स मध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने पावणेपाच लाखांची फसवणूक

Fraud

पिंपरी : Dehu Road Crime News | प्राप्तिकर खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून (Lure Of Job In IT Dept) बनावट नियुक्तीपत्र देऊन दोघांनी पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Cheating Fraud Case). याबाबत गौरव हरीश भाटीया (वय ३४, रा. सत्यसोपन सोसायटी, देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रविण एकनाथ पांचाळ Pravin Eknath Panchal (वय २२), एकनाथ पांचाळ Eknath Panchal (वय ५०, रा. पवना नगर आदर्शनगर, काळेवाडी) या बापलेकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना डिसेंबर २०२२ ते मार्च २०२४ दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डिफेन्स कॉन्ट्रक्टरकडे खासगी नोकरी करतात. त्या दरम्यान त्यांची पांचाळ पितापुत्राशी ओळख झाली. त्यांनी आमची प्राप्तिकर खात्यात ओळख आहे. तुम्हाला प्राप्तिकर खात्यात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी रोख व ऑनलाईन ४ लाख ७८ हजार ७०० रुपये घेतले. त्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र दिले. हे पत्र घेऊन ते प्राप्तिकर खात्यात गेले असता ते बनावट नियुक्त पत्र असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी पांचाळ यांच्याकडे पैसे परत मागितले. त्यांनी पैसे न दिल्याने शेवटी भाटीया यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत. (Dehu Road Crime News)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed