Dengue-Chikungunya-Zika Cases In Pune | पुण्यात आढळले डेंग्यूचे 389 संशयित रुग्ण! चिकुगुनिया आणि झिकाच्या रुग्णसंख्येत देखील वाढ

पुणे : Dengue-Chikungunya-Zika Cases In Pune | पुण्यात डेंग्यू रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून या महिन्यात डेंग्यूचे एकूण ३८९ संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढले आहे. तसेच चिकुनगुनियाचे सुद्धा ८ रुग्ण आढळले आहेत. शहरातील झिकाची रुग्णसंख्या सुद्धा ३७ वर पोहोचली आहे. त्यात एरंडवणे आणि डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक प्रत्येकी ८ रुग्ण आहेत. तर उर्वरित रुग्ण शहराच्या अन्य हद्दीत आढळून आले आहेत.
शहरात या महिन्यात आढळलेल्या डेंग्यूच्या ३८९ संशयित रुग्णांपैकी ११ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून डेंग्यू रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शहरात यंदा हिवतापाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. (Dengue-Chikungunya-Zika Cases In Pune)
महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी झिका रुग्णांची माहिती देताना सांगितले की, शहरात झिकाच्या एकुण रुग्णांपैकी एरंडवणेत ८ आणि डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ८, मुंढवा ४, पाषाण ४, खराडी ३, आंबेगाव बुद्रुक २, कळस २, सुखसागरनगर २, घोले रस्ता २, लोहगाव १ आणि धनकवडी १ असे ३७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १३ गर्भवती आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता