Deshpande Eye Hospital | देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेजर सेंटरने पहिल्यांदाच यशस्वी केली मायक्रोइनव्हेजिव्ह ग्लॉकोमा सर्जरी
नाविन्यपूर्ण उपचार आणि उपाय एकाच ठिकाणी देणारे पुण्यातील एकमेव अत्याधुनिक नेत्र रुग्णालय
पुणे : Deshpande Eye Hospital | पुण्यात पहिल्यांदाच मायक्रोइनव्हेजिव्ह ग्लॉकोमा सर्जरी (एमआयजीएस) स्टेंट सर्जरी यशस्वी पार पाडल्याची घोषणा देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेजर सेंटरने आज केली. एवढी गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया पार पाडणारे हे पहिलेच रुग्णालय ठरले आहे, त्यामुळे पुण्यातील नेत्रोपचार क्षेत्राच्या दृष्टीने हा एक मैलाचा दगड ठरला आहे.
डॉ. आनंद देशपांडे (Dr Anand Deshpand) यांनी पुण्यात ही ‘मायक्रोइनव्हेजिव्ह ग्लॉकोमा सर्जरी’ (एमआयजीएस) पार पाडली. या क्रांतिकारक शस्त्रक्रियेत डोळ्यांमधील दबाव ४५ टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतो. तसेच त्यामुळे आय ड्रॉप्ससारखी अँटी-ग्लॉकोमा औषधे कायमस्वरूपी घेण्याची गरज राहत नाही.
या यशाबद्दल बोलताना देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेजर सेंटरचे संचालक डॉ. आनंद देशपांडे म्हणाले, “हॉस्पिटलच्या दृष्टीने तसेच विशेषतः पुण्यातील नेत्रोपचार क्षेत्राच्या दृष्टीने ही अभूतपूर्व शस्त्रक्रिया आहे. रुग्णांना सर्वोत्तम उपचार व उपाय पुरविण्याची आमची कटिबद्धता त्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांची दृष्टी तर सुधारेलच, तसेच डोळ्यांवरील ताणसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होईल.”
ते पुढे म्हणाले, “एमआयजीएस शस्त्रक्रिया यशस्वी होणे हा पुण्यातील नेत्रविकार क्षेत्रात (ऑप्थॅल्मोलॉजी) मैलाचा दगड असून ग्लॉकोमाचा सामना करणाऱ्या अनेक रुग्णांना त्यामुळे आशा व कार्यक्षम उपचार मिळतील.”
ग्लॉकोमा हा जगातील अपरिवर्तनीय (कायमस्वरूपी) अंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे. त्यासाठी औषधोपचार (आय ड्रॉप्स) किंवा शस्त्रक्रियेची गरज असते.
मायक्रोइनव्हेजिव्ह ग्लॉकोमा सर्जरी (एमआयजीएस) आल्यामुळे मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन्सना फिल्ट्रेशन सर्जरीपेक्षा ग्लॉकोमावर लवकर
आणि अधिक सुरक्षितपणे उपचार करणे शक्य झाले आहे.
एमआयजीएस प्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रियेत अडथळा न येता करता येऊ शकते किंवा त्यामुळे नंतरच्या काळात अस्टिग्मॅटिझमसुद्धा उद्भवत नाही.
एमआयजीएसमुळे रुग्णांना डोळ्यांच्या पृष्ठभागावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या औषधोपचारांवर अवलंबून राहण्याचीही गरज उरत नाही. त्यामुळे दृष्टीचा दर्जा सुधारतो.
कोथरूडमधील देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेजर सेंटर हे सर्वात आधुनिक नेत्रोपचार सेवा पुरविणारे प्रसिद्ध आणि विश्वासार्ह नाव आहे.
या कामगिरीमुळे नाविन्यपूर्ण उपचार आणि उपाय एकाच ठिकाणी देणारे ते पुण्यातील एकमेव अत्याधुनिक नेत्र रुग्णालय ठरले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा