Devendra Fadnavis | मंत्री जयकुमार गोरे ब्लॅकमेलिंग प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा; म्हणाले, “सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स….”

New GR from Fadnavis Government | New GR from Fadnavis Government: Officers must stand when MLAs/MPs arrive; strict instructions for phone conversations too

मुंबई : Devendra Fadnavis | मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचे आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटी रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबाबतची चौकशी होणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” मंत्री जयकुमार गोरे यांच्या संदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. कुणाला जीवनातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांच्या संदर्भातील केस २०१६ मध्ये घडली, २०१९ मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता देखील झाली होती. त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढले गेले.

अशा प्रकरणांमध्ये कुटुंबात, समाजात अपमान होईल या भीतीपोटी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मी जयकुमार गोरे यांच्या हिंमतीची दाद देतो. त्यांना ज्यावेळी लाचेची मागणी झाली त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार केली. तेव्हा ट्रॅप लावण्यात आला. सगळी मागणी, संवाद टेप झाला. पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर सापळा रचून कॅश देताना आरोपीला पकडण्यात आले. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता”, असे फडणवीस यांनी म्हंटले.

ते पुढे म्हणाले, ” पोलीस तपासात असे निदर्शनास आले की हे एक नेक्सस होते. ही महिला, युट्युबर तुषार खरात आणि अनिल सुभेदारसह काही लोकांचा नेक्सस असल्याचे आढळले. या लोकांनी जो कट रचला याचे सगळे पुरावे सापडले आहेत. दुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत.

प्रभाकरराव देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते. त्याहीपेक्षा वाईट वाटते की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातसोबत झाले आहेत. तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडीओ देखील त्यांना पाठवण्यात आले आहेत. आता याची चौकशी केली जाणार आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली.