Devendra Fadnavis | ‘काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे, त्यांच्या….’; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
सातारा : Devendra Fadnavis | लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात असलेली वाघनखं आता भारतात आणण्यात आली आहेत. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे (Tiger Claws Used By Shivaji Maharaj) . मात्र, या दाव्यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असलेली वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण म्युझियमने पत्राद्वारे कळविले असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हंटले आहे. या संदर्भात मी विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याकडून माहिती मागवली असता, त्यांच्याकडून लिखित स्वरूपात सांगण्यात आले की, म्युझियमकडे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा नाही. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. विरोधकांकडून प्रश्न उपस्थित झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
साताऱ्यातील ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना फडणवीस म्हणाले, ” आज सुधीर मुनगंटीवार यांनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाखनखं भेट दिली आहे. खरं तर आता या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही. मात्र, काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी आणि गंज चढला आहे. त्या वाघनखांनी त्यांच्या बुद्धीवरची बुरशी आणि गंज काढण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करायचं आहे”, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Devendra Fadnavis)
पुढे ते म्हणाले, ” छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला,
तो प्रसंग आपण अनेक पिढ्यांपासून ऐकत आलो आहे. यासाठी शिवरायांनी ज्या शस्त्राचा वापर केला,
ती वाघनखं आपल्या महाराष्ट्रात आली असून साताऱ्यात दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
यापेक्षा मोठं भाग्य कुठलंही असू शकत नाही.
या वाघनखांच्या माध्यमांतून प्रत्यक्ष शिवरायांच्या इतिहासाशी जुडण्याची संधी आपल्याला मिळाली आहे”, असे फडणवीस यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक