Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर टीकास्त्र; म्हणाले – ‘श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ ज्यांना समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…’
शिर्डी : Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपचे शिर्डीत महाविजय अधिवेशन पार पडत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे हे अधिवेशन महत्वाचे मानले जात आहे. या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. ( BJP state convention in Shirdi)
“साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भाजपात महत्वाचा आहे. राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आणि नंतर सबुरी म्हणजे आपण. हा मंत्र आपण सर्वजण पाळत असतो. आपल्याला माहिती आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सर्व यशस्वी झाले. पण श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांना समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं”, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो महाविजय प्राप्त झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांना माझा साष्टांग दंडवत. कारण जनतेमुळे हा महाविजय मिळाला आहे. आपल्या या लढाईमध्ये चोवीस तास आपल्याबरोबर अमित शहा होते. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर कार्यकर्त्यांना लक्षात येत नव्हते की आपले काय चुकले? मात्र, अशा परिस्थितीत अमित शहा यांनी विविध ठिकाणी मेळावे घेत आपल्याला मार्गदर्शन केले, कार्यकर्त्यांच्या मनात ऊर्जा निर्माण केली. त्यानंतर भाजपाने महाविजय मिळवला. आज आपण शिर्डीत हे महाविजय अधिवेशन घेत आहोत याचा मला आनंद आहे.”
ते पुढे म्हणाले, ” महाराष्ट्राच्या जनतेने एक नाही तर तीन वेळा भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा दिल्या. ३० वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात १०० पेक्षा जास्त जागा मिळवणारा आपला पक्ष आहे. आपण पाहतो की जसे जी-२० असते, जी-७ असते. तसे भाजपाचे जी-६ तयार झाले, म्हणजे जे लगातार तीन वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, छत्तीसगड आणि हरियाणाबरोबर आता महाराष्ट्र देखील जुडलेला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी १७ जागा आपल्या निवडून आल्या.
जेमतेम ३५ टक्के मार्क घेऊन आपण काठावर पास झालो होतो.
मात्र, त्यानंतर आपण विधानसभेला २८८ पैकी २३७ जागा जिंकल्या आणि ८२ टक्के गुण मिळवले.
भाजपाने तर ८९ टक्के गुण मिळवले आणि आपला पक्ष मेरिटमध्ये पास झाला”,
असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. (Devendra Fadnavis)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच
ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका