Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Devendra Fadnavis

मुंबई : Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, मात्र यावरून महायुतीमध्ये मोठा वाद उफाळल्यानंतर या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निवडीला स्थगिती देण्यात आली होती. महायुतीमधील शिंदेसेना आणि भाजपा-राष्ट्रवादी असा हा वाद रायगड आणि नाशिकमध्ये आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. (Devendra Fadnavis On Guardian Minister Of Raigad And Nashik)

रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळण्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपा आग्रही आहे. यावरून महायुतीत रस्सीखेच आहे.

याासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले की, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल.

गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरु असल्याने 26 जानेवारीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला देखील पालकमंत्री लाभू शकला नव्हता. आता वाद लवकरच सोडवला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले असले तरी दोन्ही ठिकाणचे शिंदेसेनेचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले असल्याने या वादावर तोडगा काढणे सध्यातरी सोपे दिसत नाही.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed