Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही’, फडणवीसांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुंबई: Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे. ‘मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही’, असे भाष्य फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Devendra Fadnavis)
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसण्यात रस आहे का? यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ” राजकारणात अशा चर्चा होत असतात, त्याची उत्तर द्यायची नसतात. आर्थिक क्षेत्रात काम करणे ही माझी आवड होती. वकिली करणे हे माझे स्वप्न होते, पण ते स्वप्न भंगले. त्यामुळे मी गेल्या २५ वर्षांपासून विधानसभेत जनतेची वकिली करत आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा