Devendra Fadnavis | “मला विष पचवायची सवय”, देवेंद्र फडणवीसांचे भाष्य;म्हणाले, “ज्यादिवशी लोकं घरी पाठवतील, त्यादिवशी…”
मुंबई : Devendra Fadnavis | राज्यात राजकीय टीका टिप्पणी करताना भाषेचा स्तर खालावला आहे. याबाबत खंत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली आहे. मला विष पचवायची सवय आहे असे सांगताना त्यांनी आपल्या राजकारणामागची भूमिका स्पष्ट केली आहे.
मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, मी राजकारणात जेव्हा आलो त्यावेळी एकच गोष्ट शिकलो की, राजकारणात तुमच्याकडे संयम असला पाहिजे. शिव्या ऐकण्याची सवय असली पाहिजे. तुम्हाला विष पचवता आले पाहिजे. आता तर गेली दोन वर्षे तुम्ही तर बघतच आहात. मी किती विष पचवतो. त्यामुळे विष पचवण्याची देखील सवय मला आहे, असे मिश्किल विधान फडणवीसांनी केले.
ते पुढे म्हणाले, हे सगळे करून मला असे वाटते की, शेवटी आपले ध्येय काय आहे. राजकारणात पदे भोगण्या करता आलेलो नाही. संपत्ती तयार करण्यासाठी आलो नाही. २५ वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे. कुठलीही शाळा उघडली नाही. कॉलेज उघडले नाही.
साखर कारखाना उघडला नाही. सूतगिरणी उघडली नाही. कुठलेही स्वतः करिता वैयक्तिक साम्राज्य तयार केले नाही.
केवळ आणि केवळ जी काही जनतेची सेवा करता येईल, ती करण्या करिता इथे आहे.”
“माझे स्टेक्स काहीच नाहीत. अनेक लोकांना राजकारण याकरिता टिकवायचे असते
की, राजकारणामुळे त्यांचा धंदा टिकतो. मला धंदाच नाहीये. त्यामुळे मला ज्यादिवशी लोक घरी पाठवतील,
त्यादिवशी शांतपणे घरी जाईन”, असे भाष्य फडणवीस यांनी केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद