Devendra Fadnavis | पुनीत बालन ग्रुप प्रायोजित ‘तरंग 2025’ या कार्यक्रमादरम्यान CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉप्स 24’ चे उद्घाटन; मुख्यमंत्री म्हणाले – ‘राज्याचा ‘सायबर प्लॅटफॉर्म’ सर्वोत्तम’

Punit Balan-Devendra Fadnavis

पुणे : Devendra Fadnavis | पोलीस तपासात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशातील सर्वात चांगला ‘सायबर प्लॅटफॉर्म’ राज्य शासनाने तयार केला आहे. सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना 1945 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Pune Police News)

पुणे पोलिसंच्या वतीने आयोजित ‘तरंग 2025’ (Tarang 2025) कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal), पुनीत बालन ग्रुपचे (Punit Balan Group-PBG) अध्यक्ष युवा उद्योजक पुनीत बालन (Young Entrepreneur Punit Balan), पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma IPS), इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ‘तरंग 2025’ हा कार्यक्रम पुनीत बालन ग्रुपने प्रायोजित केला होता.

https://www.instagram.com/p/DGGRXklJKbA

गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ‘कॉप्स 24’ तुकडीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याबरोबरच कॉप्ससाठी 125 दुचाकी आणि 39 चारचाकी वाहने पोलीस दलात समाविष्ट करण्यात आली. तसेच ‘माय सेफ अ‍ॅप’ चे लॉचिंग करण्यात आले. यावेळी विशेष कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस 24 तास काम करतात. त्यांना चांगल्या सुविधा दिल्या, तर ते नागरिकांना न्याय देतील. त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पुणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाचे शहर आहे. विविध देशातील नागरिक शहरात येत असतात. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांंकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरात अनेक घटना घडल्या. परंतु, पोलिसांनी त्यावर कठोर कारवाई केली. त्यांना शिक्षाही झाल्या आहेत. पोलिसांना पायाभुत सुविधा, सीसीटीव्ही, वाहने दिली आहेत. आता रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती दिसावी. रिस्पॉन्स टाईम कमी व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पुन्हा सोने चोरीला जाणार नाही याची काळजी घ्या

या कार्यक्रमात शहरातील सराफी पेढीतून चोरीला गेलेल्या सोन्यांपैकी 17 किलो सोन्याचे दागिने सराफ व्यावसायिकाला परत करण्यात आले. याचा संदर्भ देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की पोलिसांना कायदा सुव्यवस्था, बंदोबस्त, मोर्चा, आंदोलन, गंभीर गुन्ह्याचा तपास करावा लागतो. पोलिसांनी ही कामे करायची की तुमचे सोने पकडत बसायचे. आता पोलिसांनी सोने परत केले आहे. ते पुन्हा चोरीला जाणार नाही, याची काळजी स्वत:च घ्यावी.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रास्ताविक केले. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आभार मानले.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ‘तरंग 2025’ या पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध संगीतकार अजय -अतुल (Ajay Atul) यांनी विविध हिंदी मराठी चित्रपट गीते सादर करुन पोलीस व त्यांच्या कुटुंबियांची मने जिंकली. (Devendra Fadnavis)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर,
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या

Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग;
मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त

Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप,
म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”

Pune Crime News | पुणे : सासूकडून सून आणि नातवाचा छळ

You may have missed