Devendra Fadnavis Interview | ‘मुख्यमंत्र्यांचा संवाद पुणेकरांशी’ ! पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे मांडणार ‘व्हिजन’; अभिनेत्री गिरिजा ओक घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

Devendra Fadnavis Interview | 'Chief Minister's Dialogue with Punekars'! 'Vision' to present Pune's all-round development; Actress Girija Oak to interview the Chief Minister

पुणे : Devendra Fadnavis Interview | महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भविष्यातील विकासाचे व्हिजन मांडण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुणे शहरतर्फे ‘संवाद पुणेकरांशी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता पुणेकरांशी लाईव्ह संवाद साधणार आहेत.  

प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक या पुणेकरांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांशी संवाद साधतील. प्रतिष्ठित मान्यवर पुणेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पुण्यातील सर्व प्रभागांमध्ये ‘लाईव्ह स्क्रीन’वर दाखवला जाणार असून, त्या माध्यमातून ५ लाखांहून अधिक नागरिक या सोहळ्याचे साक्षीदार होतील, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले.

….

​दहा लाख घरांपर्यंत पोहोचणार ‘संकल्पनामा’

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘घर चलो’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचाही शुभारंभ करण्यात येत आहे. पुढील दोन दिवस चालणाऱ्या या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीचा ‘संकल्पनामा’ पुण्यातील १० लाख नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  

​पुणे हे देशाला दिशा देणारे शहर असून, येथील वारसास्थळे, पर्यावरण, उद्योग आणि नागरी जीवन समृद्ध करण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. शहराच्या प्रश्नांची सखोल जाण असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणेकरांच्या अपेक्षांच्या पूर्ततेचा ‘रोडमॅप’ आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे ‘व्हिजन’ या संवाद कार्यक्रमात मांडणार आहेत.

– राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस, भाजप

….

​’संवाद पुणेकरांशी’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुणेकरांशी संवाद

संवादक – प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक

​दिनांक: रविवार, ११ जानेवारी २०२६  

​वेळ: सायंकाळी ७ वाजता