Devendra Fadnavis News | पुन्हा निवडणुका घेण्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे भाष्य; म्हणाले – ‘आम्हाला हे माहित होतं …’
मुंबई: Devendra Fadnavis News | विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. “आम्ही आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह तोडला”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. (Maharashtra Assembly Election Results 2024)
https://www.instagram.com/p/DCteW7uJt4J
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” लोकसभेच्या निवडणुकीत जो फेक नरेटीव्ह तयार करण्यात आला होता. त्या फेक नरेटीव्हच्या विरोधात लढणाऱ्या सर्व संघटनांचा हा विजय आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि आमच्या महायुतीच्या एकजुटीचा हा विजय आहे. अमित शहा यांचे मी आभार मानतो. तसेच लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो. महाराष्ट्रातील जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहेत. राज्यातील जनतेला दंडवत. जनतेने विरोधकांना कृतीतून उत्तर दिलं.
https://www.instagram.com/p/DCtaohjJ9CH
मी याआधीही सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. चक्रव्यूह तोडून दाखवला. महाराष्ट्र मोदींजींच्या पाठीशी खंबीर उभा आहे. मी याआधी म्हटलं होतं आणि आताही सांगतो की या विजयात माझा खूप छोटासा वाटा आहे.
https://www.instagram.com/p/DCtX-S7JOyF
मला असं वाटतं की कोणत्याही लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधीपक्ष असणं गरजेचा आहे. त्यामुळे जे विरोधी पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत. त्यांचा आम्ही सन्मान करू. त्यांचा आवाज छोटा असो की मोठा असो. ते ज्या गोष्टी सांगतील त्या योग्य गोष्टीवर आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/DCtfYWjt927/?img_index=1
पुन्हा निवडणुका घ्या, या विरोधकांच्या मागणीवर बोलताना ते पुढे म्हणाले, ” आम्हाला हे माहिती होतं. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला तर तेथील ईव्हीएम परफेक्ट आणि महाराष्ट्रात पराभव झाला तर लगेच ईव्हीएम धोक्यात आलं? मला विरोधकांना काही सल्ला द्यायचा नाही. पण खरी कारणे काय आहेत? हा विचार विरोधकांनी करावा”, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
https://www.instagram.com/p/DCtPDPipi8b
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट