Devendra Fadnavis On Ajit Pawar | देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘अजित पवारही लवकरच भगवे होणार’

Devendra Fadnavis Ajit Pawar

मुंबई: Devendra Fadnavis On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘कटेंगे तो बटेंगे’ असा नारा दिला असून त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन कटेंगे तो बटेंगे असा नारा देत आहेत. पण हा महाराष्ट्र आहे, इथे कटेंगे, बटेंगे चालत नाही”, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य करताना अजित पवारही लवकरच भगवे होणार असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” अजित पवार हे पलीकडून आमच्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आमच्या गोष्टी लक्षात येत नसतील. त्यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ हा नारा ठीक नसल्याचं म्हटलं असलं तरी त्यांनी ‘एक है तो सेफ है’ हा नारा ठीक असल्याचं म्हटलं आहे. याचा अर्थ अजित पवारांना सुचवायचे आहे की, ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणू नका, ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणा. आम्हाला त्यांची भूमिका मान्य आहे.”

अजित पवार यांची विचारसरणी भाजपाशी जुळत नाही, त्याचे काय? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले, “आमची संपूर्ण विचारसरणी जुळली असती तर त्यांचा वेगळा पक्ष कसा राहिला असता. आम्ही आधीच जाहीर केले आहे की, आमची आणि त्यांची राजकीय युती आहे. ते आता आमच्या बरोबर आले आहेत, हळूहळू तेही आमच्या विचारात रंगतील. अजित पवार यांनाही आम्ही भगवे करू”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed