Devendra Fadnavis On Ajit Pawar | अजित पवारांना महायुतीत घेऊन चूक झाली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले,”काळाची गरज होती, त्यामुळे काळाची गरज असताना…”
मुंबई : Devendra Fadnavis On Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीने (Mahayuti) कंबर कसलेली पाहायला मिळतेय. अजित पवार यांचा महायुतीत सहभाग झाल्याने मतदारांनी नाकारल्याचे काही नेतेमंडळी मांडणी करत आहेत. दरम्यान अजित पवारांना सातत्याने महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांकडून लक्ष्य केले जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही (Rashtriya Swayamsevak Sangh – RSS) अजित पवारांच्या सहभागावर भाजपचे कान टोचण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) प्रचारावरूनही शिंदे सेनेच्या (Shivsena Shinde Group) नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. यावरून महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत.
अजित पवार यांच्यासोबत युती करुन चूक केली का? असा सवाल भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी विचारणा असता ही काळाची गरज होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवारांना सोबत घेऊन चूक झाली हे असं म्हणणार नाही, काळाची गरज होती, त्यामुळे काळाची गरज असताना संधी आली, तर सोडायची नसते. अजित दादांना महायुतीतून वगळणार नाही, लोकसभेप्रमाणेच आम्ही विधानसभेला एकत्र आहोत.
अजित पवार ४० वर्ष राजकारणात आहेत. ते आमदारांना घेऊन सिद्धीविनायकाला गेले. त्यांना असं कधी पाहिलं होतं का? पण आता ते गेले. त्यांना काही गुण आमचे लागणार. त्यामुळे काळजी करू नका, स्थिर स्थावर होण्यासाठी वेळ लागतो, त्याचा फायदा होईल, असं भाष्यही देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. (Devendra Fadnavis On Ajit Pawar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी