Devendra Fadnavis On Face Of Mahayuti CM | ‘विधानसभेचा प्रचार शिंदेंच्या नेतृत्वात मात्र मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतर ठरणार’, देवेंद्र फडणवीसांचे भाष्य

devendra-fadnavis-eknath-shinde

मुंबई: Devendra Fadnavis On Face Of Mahayuti CM | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचे (BJP) परराज्यातील नेतृत्व महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना विभागनिहाय मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Devendra Fadnavis On Face Of Mahayuti CM)

लोकसभेला महायुतीला फटका बसला त्यानंतर आता विधानसभेसाठी भाजपने कंबर कसल्याचे दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणूक आमची महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढेल, पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ हे शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा करून ठरवेल, असे भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यायचा नाही, अशी भूमिका आधीच घेतली आहे. संख्याबळानुसार आम्ही मुख्यमंत्री ठरवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. आता महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनेही मुख्यमंत्रीपद कोणाला ते विधानसभा निवडणुकीनंतरच ठरेल हे स्पष्ट केले आहे.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार,
हे सांगण्याचा अधिकार मला नाही. आमचे संसदीय मंडळ हे एकनाथ शिंदे, अजित पवार
या दोन पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेईल.
सरकार म्हणून आम्ही निवडणुकीचा प्रचार एकत्र करत आहोत.

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असा शब्द तुम्ही दिला आहे का? असा प्रश्न केला असता फडणवीस म्हणाले की, असा शब्द देणे या गोष्टी आमच्या पातळीवर नसतात. ती चर्चा संसदीय मंडळात होते. शिंदेंशी या मंडळाची चर्चा झाली असेल.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed