Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…
मुंबई: Devendra Fadnavis On Jayant Patil | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (Sharad Pawar NCP) जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या कथित सिंचन घोटाळ्याच्या (Irrigation Scam Maharashtra) खुल्या चौकशीसाठी माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील (RR Patil) यांच्या स्वाक्षरी असलेल्या फाईल्स त्यांना दाखवल्या होत्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी हा आरोप केला आहे.
जयंत पाटील म्हणाले, ” राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह वाढवण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे अजित पवार यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. तुम्ही विरोधी पक्षात असताना अजित पवारांवर आरोप केले. सत्तेत आल्यानंतर त्यांची चौकशी केली आणि आरआर पाटील यांच्यावर आरोप करणारी फाइल त्यांना दाखवली. म्हणजे तेव्हापासून आमच्या पक्षातील अंतर्गत कलहाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न सुरू होते.
अजित पवारांना इतर फाईल्स दाखवून दहा वर्षे ब्लॅकमेल करण्यात आले. यावरून त्यांना पुन्हा पुन्हा भाजपसोबत जाण्याची इच्छा का होती हे स्पष्ट होते. अजित पवारांना ब्लॅकमेल करण्यात आले,” असं जयंत पाटील यांनी म्हंटले.
ते पुढे म्हणाले, ” मला वाटते की अजित पवार यामुळेच घेरले गेले आहेत. मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आणखी अडचणीत आणले आहे. यातून फडणवीस यांची कार्यशैली तसेच गेल्या दहा वर्षांतील त्यांच्यातील संबंधही समोर आले. त्यांनी ती फाईल विरोधी पक्ष नेत्यांना दाखवली असती तर मला समजले असते. पण अजित पवार फक्त विरोधी आमदार होते”,असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान आता जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ” जयंत पाटील यांचा चेहरा बघा. ते मस्करीच करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायमच असतं. त्यांना तुम्ही गांभीर्याने घेऊ नका”, असे म्हणत फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा