Devendra Fadnavis On Kunal Kamra | ‘…तर हे सहन करणार नाही’; कुणाल कामराच्या गाण्यावरील वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा (Video)

Devendra Fadnavis

मुंबई : Devendra Fadnavis On Kunal Kamra | स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे तयार करुन ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

https://www.instagram.com/p/DHk9mzmpVF9

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणे रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात कामराविरोधात गुन्हा दाखल झाला. कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरे म्हणजे कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की, महाराष्ट्रातील जनतेने २०२४ साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार, हे दाखवून दिले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली, हे जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे अशाप्रकारे खालच्या स्थराची कॉमेडी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे चुकीचे आहे.”

पुढे ते म्हणाले की, तुम्ही जरुर स्टँडअप कॉमेडी करा, पण अपमानित करण्याचे काम कोणी करत असेल, तर हे सहन केले जाणार नाही. हे अतिशय चुकीचे आहे. कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. तसेच, कुणाल कामरा जे संविधानाचे पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान जर त्यांनी वाचले असेल, तर संविधानाने सांगितलेले आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की, त्यांनी माफी मागितली पाहिजे. (Devendra Fadnavis On Kunal Kamra)

शिवसैनिक आक्रमक…

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. क्लबमधील खुर्च्यांची, संपूर्ण सेटची तोडफोड केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांचीच खिल्ली उडविल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. त्याचबरोबर वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेर देखील शिवसैनिकांनी कामराचे फोटो जाळले आहेत.

You may have missed