Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana | फडणवीसांचे लाडक्या बहिणींना आश्वासन, म्हणाले – ” मला राखीची आण, काहीही झालं तरी या योजनांवर…”
नागपूर : Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana | आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024 ) डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने (Mahayuti Govt) काही योजना जाहीर केल्या. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सगळीकडे बोलबाला सुरु आहे. मात्र सरकारी तिजोरीत पैसा नसताना ही योजना लागू केलेली आहे.
केवळ निवडणुकीपुरती ही योजना असल्याची टीका विरोधक करत आहेत. महायुती कडून या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार केला जात आहे. दरम्यान विरोधकांच्या होणाऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“काही लोक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या शासकीय योजना बंद करू पाहत आहेत. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत या योजना बंद होऊ देणार नाही”. दरम्यान, लाडकी बहीण योजना आणून आमच्या सरकारने काही चूक केली आहे का?”, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारने आज (दि.३१) दुपारी नागपूरच्या रेशीम बाग मैदानात महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “आपण सुरू केलेल्या योजना यापुढेही चालू ठेवायच्या आहेत ना? मुलींना मोफत शिक्षण, शुभमंगल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना, लेक लाडकी योजना, यांसारख्या इतर योजना आपल्याला चालू ठेवायच्या आहेत ना? कारण काही लोक या योजना बंद व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करत आहेत.
काही लोक म्हणतात, या योजना चालू ठेवू नका, मला या सगळ्याचं खूप दुःख वाटतंय. मला सर्व बहिणींना सांगायचं आहे की राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. परंतु, लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी ती योजना रद्द करावी यासाठी याचिका दाखल केली आहे.”
ते पुढे म्हणाले, ” हे वडपल्लीवार कोण आहेत माहितीय का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस नेते विकास ठाकरे
यांचे ते निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईट हॅन्ड म्हणून ओळखले जातात.
वडपल्लीवार यांनी न्यायालयाला सांगितलं की या योजनांवर फार पैसा खर्च होतो. त्यामुळे या योजना बंद करा.
विरोधक या योजना बंद व्हाव्यात यासाठी न्यायालयात गेले, मात्र बहिणींनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मी तुम्हाला आश्वासन देतो
की तुमचा हा देवा भाऊ इथे आहे तोवर उच्च न्यायालयात मोठ्यात मोठा वकील उभा करू, मला या राखीची आण आहे,
काहीही झालं तरी या योजनांवर स्थगिती येऊ देणार नाही. आम्ही प्रयत्नांची शर्थ करून उच्च न्यायालयात खटला लढू आणि
या योजना चालू ठेवू”, असे फडणवीसांनी सांगितले. (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद