Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana | “अरे वेड्यांनो, भाऊबीज कधीही परत घेतली जात नाही”; फडणवीसांचा टोला, म्हणाले – “कुणाचा बापही ही योजना…”
जळगाव : Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजनेची महायुती सरकारकडून (Mahayuti Govt) घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतंरुपी आशीर्वाद द्या, नाही तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केलं आहे. अमरावतीत महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)
या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या विधानानंतर विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. या वक्तव्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
मतं जर दिली नाही तर पैसे परत घेतले जातील असे महायुतीमध्ये असलेले आमदार रवी राणा यांनी गंमतीने म्हटले होते. तर शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Eknath Shinde) आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी डिसेंबर नंतर या योजनेतून विरोधकांची नावे काढून टाकली जातील असे वक्तव्य केले होते. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण निर्णय घेतला तर कुणाच्या पोटात दुखायला लागलं.
कुणी म्हणालं लाच देताय का, कुणी म्हणालं मतं खरेदी करताय.
अरे नालायकांनो, कुणीही बहिणीचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील.
कुणी म्हणालं की १५०० रुपये माघारी घेऊ. अरे वेड्यांनो, दिलेली भाऊबीज परत घेत नाहीत.
कुणाचा बापही ही योजना बंद करू शकत नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले
की, महिलांना सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
येत्या काळात महिला सक्षम झाल्यानंतर महाराष्ट्र कधीच मागे पडणार नाही.
मुख्यमंत्री आपण योग्य निर्णय घेतला, कारण आमच्या महिला बचत गटाचा एक एक पैसा परत करतात.
३१ ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट महिन्यांचे पैसे आम्ही देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये