Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | ‘महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करण्याचा’; फडणवीसांचा निशाणा म्हणाले – “लाडकी बहीण…”
पुणे : Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) उपस्थितीत भाजपाचे पुण्यात महाअधिवेशन सुरु आहे (BJP Executive Meeting In Pune). आगामी विधानसभा निवडणूका (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यासमोर ठेऊन भाजपने तयारी सुरु केलेली आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. तसेच महायुती सरकारने (Mahayuti Govt) जाहीर केलेल्या योजनांचा कसा अपप्रचार केला जातोय यावरही भाष्य केले आहे.
फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करण्याचा आहे. आपल्या सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या आहेत. यामध्ये जलयुक्त शिवार आणि मेट्रो सारख्या योजनांचा समावेश आहे. महायुतीच्या सरकारने पुन्हा एकदा जनसामान्यांच्या हिताच्या योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सन्मानाची योजना आहे. मात्र, महाविकास आघाडीचे लोक लबाड आहेत. विधानसभेत या लोकांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला. मात्र, हे लोकं गावात लाडकी बहीण योजनेचे पोस्टर लावत आहेत”, असे फडणवीसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीचे लोक लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेत आहेत, मात्र, ते अर्ज दाखल करत नाहीत. याद्वारे महायुती सरकार विरोधात महिलांच्या मनात रोष तयार करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे, ही योजना फसावी यासाठी मविआच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू आहे”, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi)
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशात राष्ट्रीय नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawade),
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw), भुपेंद्र यादव (Bhupender Yadav),
पीयूष गोयल (Piyush Goyal), आशिष शेलार (Ashish Shelar), पंकजा मुंडे (Pankaja Munde),
मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) उपस्थित आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा