Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्यावरून फडणवीसांचा मविआवर निशाणा, म्हणाले – “काहीही झालं तरी चालेल पण,…”

Devendra Fadnavis

कोल्हापूर : Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारानं दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण (Badlapur School Girl Incident Case) केल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) प्रकरणानं सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. दरम्यान लोकं रस्त्यावर उतरल्यानंतर राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.

मात्र या प्रकरणी पोलिसांनी केलेली दिरंगाई, राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही आता ठरवलं आहे की अशा प्रकारच्या घटनांमधील आरोपींना सोडणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. गुन्हेगारांना फाशीपर्यंतची शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करू.

त्यांना कठोर शिक्षा मिळेपर्यंत शांत बसायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. कोणत्याही परिस्थितीत महिलांवरील अत्याचार आणि अशा प्रकारची परिस्थिती आम्ही सहन करणार नाही, असे फडणवीसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, मला एक गोष्ट सांगायची आहे मुलगी कोणतीही असो ती आपलीच असते. कोलकात्यामध्ये एका डॉक्टर तरुणीवर भयानक अत्याचार झाले, अत्याचार करून तिचा खून करण्यात आला मात्र महाविकास आघाडीतील लोकांनी त्या प्रकरणावर बोलण्यासाठी तोंडं उघडली नाहीत. कोलकत्यातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतरही हे लोक ममता बॅनर्जी यांचं कौतुक करत राहिले. त्यांनी एका शब्दाने त्या घटनेचा निषेध नोंदवला नाही. (Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi)

महाराष्ट्रात अशीच घटना घडल्यावर मात्र हेच लोक सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,
अशा प्रकारच्या मागण्या करू लागले आहेत. मी या लोकांना एवढंच सांगतो,
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे, रडायचं नाही लढायचं. आम्ही पळून जाणारे नाही, आम्ही लढणारे आहोत.

अशा प्रकरणांमधील नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.
काहीही झालं तरी चालेल या नराधमांना समाप्त केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.
ही गोष्ट विरोधकांना ठणकावून सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यांना राजकारण करू द्या.
कारण ते संवेदनाहीन आहेत, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली.

कोल्हापूरच्या तपोवन मैदानात आज गुरुवार (दि.२२) महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
त्यावेळी होत असलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”, शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या