Devendra Fadnavis On Maratha Reservation | ‘ठाकरे सरकारमुळेच मराठा आरक्षण रद्द’; फडणवीसांची टीका, म्हणाले – ‘आज जे राजकारण सुरु आहे…’

Devendra Fadnavis

पुणे : Devendra Fadnavis On Maratha Reservation | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी (OBC Samaj) आणि मराठा समाज (Maratha Samaj) आमने-सामने आले आहेत (OBC-Maratha Reservation) . आरक्षणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. दरम्यान याबाबत पुण्यातील आयोजित महाअधिवेशनात (BJP Executive Meeting In Pune) बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले, “आज राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. माझं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना आवाहन आहे की त्यांनी आधी मराठा आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं मंजूर आहे का, हे त्यांनी आधी सांगावं.

मात्र, महाविकास आघाडीचे तिन्ही नेते आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेत आहेत. मराठा आणि ओबीसी समाजाला झुलवत ठेवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. महाविकास आघाडीचा हा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. (Devendra Fadnavis On Maratha Reservation)

ते पुढे म्हणाले, ” भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाबाबत नेहमीच भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे, असं आमचं दिवसापासूनचं मत आहे. खरं तर आरक्षणाची लढाई १९८२ साली सुरू झाली होती. त्यावेळी अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण मागितलं होतं.

मात्र, त्यांनी आरक्षण दिलं नाही. तेव्हापासून आजपर्यंत राज्यात अनेक सरकारे आलीत. शरद पवार हे स्वत: चार वेळा मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी आरक्षण दिलं नाही. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. केवळ आरक्षण दिलं नाही तर ते उच्च न्यायालयात टिकवलं. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही दाखल करण्यात आलं होतं. मात्र जोपर्यंत आम्ही सत्तेत होतो तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने तीन वेळा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आलं आणि मराठा आरक्षण रद्द झालं.

राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार आल्यानंतर आम्ही मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले.
आज त्याचा फायदा मराठा समाजाला होतो आहे. राज्यात पोलीस भरती (Police Bharti) सुरू आहे.
हजारो मराठा तरुणांना नोकरी लागली आहे. हे सगळं होत असतानादेखील ज्याप्रकारे मराठा आरक्षणाचं राजकारण सुरू आहे,
ते दुर्दैवी आहे”, असे फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशात राष्ट्रीय नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawade),
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw), भुपेंद्र यादव (Bhupender Yadav),
पीयूष गोयल (Piyush Goyal), आशिष शेलार (Ashish Shelar), पंकजा मुंडे (Pankaja Munde,
मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) उपस्थित आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?

You may have missed