Devendra Fadnavis On Sharad Pawar | ‘पोलिस गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद’, शरद पवारांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले – ‘त्यांच्या काळात…’
पुणे: Devendra Fadnavis On Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर प्रशासनाने नाकाबंदी (Police Nakabandi), तपासणी करून कारवाईत शेकडो कोटी रुपये जप्त केले आहेत. यावरुनच आता शरद पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. पोलिस गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना (Mahayuti Candidate) रसद पुरवली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
बारामती येथे दीपावली पाडव्यानिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला. पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते. पण अधिकाऱ्यांचे भवितव्य संकटात जावू नये म्हणून मी अधिक बोलत नाही, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले, ” या सरकारचं वैशिष्ट्य आहे की, विमानाने एबी फॉर्म पाठवले. पोलीस दलाच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये अशी गळ घातली आहे.
पण ऐकायला मिळतंय की पोलीस दलाची वाहनं आहेत त्यातून उमेदवारांना रसद पोहोचवली जात आहे. माझ्या हातात ऑथेटिंक माहिती असती तर मी वाटेल ते केलं असतं. पण माहितीशिवाय भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी केलेल्या दाव्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळात असं चालायचं. आता त्यांना तो भास होत असेल. आमच्या काळात तरी असं काही होत नाही”, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा