Devendra Fadnavis On Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या टीकेवरून फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले – “मी आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदून…”

Devendra Fadnavis - Supriya Sule

मुंबई : Devendra Fadnavis On Supriya Sule | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) महायुती आणि महाविकास आघाडीने (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) रणनीती आखत तयारी सुरु केलेली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar NCP) पक्षाच्या प्रवक्त्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याच्या सूचना दिल्याचे समोर आले.

‘शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही’, असा नाराच सुप्रिया सुळे यांनी बैठकीत दिला. आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील. मुख्यमंत्र्यांवर आपण टीका करायची नाही. सरकारवर टीका करताना फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची, असे बैठकीत सुप्रिया सुळे म्हंटल्याची वृत्ते माध्यमातून प्रसिद्ध झाली.

त्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ” मला ही आनंदाची गोष्ट वाटते, यातून राजकारणातलं स्थान लक्षात येतं. तुम्हाला फक्त एका व्यक्तीवरच हल्ला करावासा वाटतो, शरद पवारही तेच करतात, काँग्रेसही तेच करते. मनोज जरांगे तर आहेतच.

पण एकच गोष्ट सांगतो यांना वाटतंय हे माझ्या विरोधात चक्रव्यूह तयार करत आहेत.
मात्र त्यांना एकच सांगणार आहे की तुम्ही (विरोधक) चक्रव्यूह करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे,
चक्रव्युहात कसं शिरायचं हे मला माहित आहे आणि बाहेर कसं यायचं आहे हे पण मला माहीत आहे.
काहीही झालं तरीही माझा अभिमन्यू होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed