Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘मेरी हिम्मत परखने की गुस्ताखी मत करना’, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

मुंबई : Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी व महायुतीमधील (Mahayuti) नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘एक तर तू राहशील किंवा मी तरी राहीन’, अशा शब्दात निशाणा साधला. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

” गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की, ज्यावेळी अर्जुनाने पाहिलं की, माझे सगळे नातेवाईक माझ्यासमोर आहेत. यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का? कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत.

अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसांचे डाव होते. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन”, असे उद्धव ठाकरे फडणवीसांना उद्देशून म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत दिलेल्या इशाऱ्याला भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई भाजपाने (Mumbai BJP) उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

त्याच्या प्रत्युत्तरात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस शेरो शायरी करताना दिसत आहेत. फडणवीस म्हणाले की “मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले ही कई फसानो का रुख मोड़ चुका हूँ मैं!”

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपा वरून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी वाढेल अशीच काही चिन्हे दिसत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”

Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात

Maharashtra Assembly Election 2024 | मनसे पुण्यातील सर्व जागा लढण्याच्या तयारीत; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

You may have missed