Devendra Fadnavis On Vishalgad Encroachment | विशाळगडावरील अतिक्रमणावर कारवाई होणारच; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Devendra Fadnavis

कोल्हापूर : Devendra Fadnavis On Vishalgad Encroachment | मागील काही दिवसांपासून विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गडावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली त्याअंतर्गत त्यांनी आपल्या समर्थकांना चलो विशाळगडचा नारा दिला होता. पण संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) विशाळगडावर पोहचण्यापूर्वीच तेथिल परिसरात हिंसाचार झाला. तेथिल घरे आणि दुकानांची जाळपोळ झाली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी तणाव निर्माण झाला होता.

किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणामध्ये विशाळगडावर आणि पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड नासधूस करण्यात आली. ज्यांचा अतिक्रमणाशी संबंध नाही अशा लोकांच्या मालमत्तेचं प्रचंड नुकसान झाले. यानंतर आता आज जिल्हा प्रशासनाला जाग आली असून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनामधील प्रमुख अधिकारी गडावर पोहोचले आहेत. विशाळगडावर अतिक्रमण केलेली दोन आस्थापने प्रशासनाने काढली आहेत. (Devendra Fadnavis On Vishalgad Encroachment)

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विशाळगडाच्या अतिक्रमणावरून भाष्य केले आहे.
विशाळगडावरील अतिक्रमणावर कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणारच असे त्यांनी म्हंटले आहे.
विशाळगडावरील अतिक्रमण हटवले पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती.
मात्र अतिक्रमण हटवताना ते कायदेशीरपणे व्हायला हवं असे फडणवीस म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed