Devendra Fadnavis | ‘दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात ?’ फडणवीस म्हणाले – ‘राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ त्यामुळे…”

Devendra Fadnavis

मुंबई : Devendra Fadnavis | मागेच स्वतः फडणवीसांनी पक्ष संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा नव्या अध्यक्षाच्या शोधात आहे (BJP National President) . महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची जागा घेतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

या पदासाठी ज्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत त्यात फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपाचे नवे अध्यक्ष असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या अध्यक्षाच्या शोधासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे.

फडणवीसांचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्याशी चांगले संबंध आहेत. तसेच फडणवीस संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र या चर्चेवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ आहे. त्यामुळे राजकारणात उद्या काय घडेल, हे सांगता येत नाही. मात्र, तुम्ही जो प्रश्न ज्या अनुषंगाने विचारलात त्यांचे उत्तर मी एकाच वाक्यात देईन. ‘मी येथेच आहे.’ म्हणजेच यावरून देवेंद्र फडणवीस हे कुठेही जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. (Devendra Fadnavis)

महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता कशी दूर होईल, या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘माध्यमं यासाठी जबाबदार आहेत. दररोज सकाळी नऊ वाजता तुम्ही एक चेहरा दाखवता. तिथूनच सगळी कटुता सुरू होते आणि दिवसभर तेच सुरू राहते. तो चेहरा दाखवणे बंद करा, मग अवघ्या आठ राज्यातील कुटता दूर होईल’, असे टोला फडणवीस यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचे नाव न घेता लगावला आहे.

फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्ष [पदाबाबत विचारले असता त्यांनी ‘मी येथेच आहे’
असे जरी म्हंटले असले तरी ‘राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ आहे.
त्यामुळे राजकारणात उद्या काय घडेल, हे सांगता येत नाही’ हे त्यांचे विधान सूचक आहे.
त्यामुळे आगामी काळात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होईल.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन
केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

You may have missed