Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का, राष्ट्रवादी पक्षाने घेतला मोठा निर्णय

बीड : Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात यंत्रणांच्या कारवाईला वेग आलेला असताना मंत्री धनंजय मुंडेंना पक्षाने मोठा धक्का दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar NCP) पक्षाची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण (Rajeshwar Chavan) यांनी दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात असलेला आरोपी विष्णू चाटे (Vishnu Chate) हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, तर या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवला जात असलेल्या वाल्मिक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहेत, त्यामुळे आता पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेत अजित पवार यांनी बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्तीची निर्णय घेतला.
त्यानंतर यापुढे पक्षात केल्या जाणाऱ्या तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या,
अशा सूचना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्या आहेत.
त्यामुळे आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा कोणत्याही गुन्ह्याच्या घटनेमध्ये सहभागी झालेले लोक असतील त्यांना पदापासून दूर ठेवलं जाईल, अशी राष्ट्रवादी पक्षाची मानसिकता दिसून येत आहे. (Dhananjay Munde)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच
ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका