Dhananjay Munde News | मंत्रिपद जाणार? धनंजय मुंडेंची मंत्रिपदाबाबत धाकधूक अन् धास्ती वाढली; बारामतीत घडामोडींना वेग

Dhananjay Munde

बारामती : Dhananjay Munde News | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येवरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या हत्याप्रकरणाचे विधानसभेसह लोकसभेतही पडसाद उमटले. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप केला जात आहे. त्यामुळे धनंजय मुडेंवर विरोधकांकडून निशाणा साधला जातोय.

दरम्यान महायुती सरकारचे (Mahayuti Govt) खातेवाटप शनिवार (दि.२१) जाहीर झाले. त्यामध्ये धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी (Maratha Samaj) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री धनंजय मुंडे यांना होता.
त्यामुळेच वाल्मिक कराड यांच्यामार्फत देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
आपल्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत म्हणून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी
आणि त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Dhananjay Munde News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार