Dhananjay Munde On Amit Shah Statement | शरद पवारांच्या टीकेवरून धनंजय मुंडे म्हणाले, ‘तथ्य असल्याशिवाय शहा बोलणार नाहीत…’
अहमदनगर : Dhananjay Munde On Amit Shah Statement | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणनीती ठरवण्याच्या अनुषंगाने भाजपचं महाअधिवेशन पुण्यात पार पडले (BJP State Executive Body’s convention in Balewadi Pune). या अधिवेशनात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर बोचरी टीका केली . शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याची टीका शहा यांनी केली आहे.
अमित शहा म्हणाले, ” भारतातील राजकारणात भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली. “एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाची सत्ता आली तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे, जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जाते. २०१४ ला भाजपा सत्तेत आली मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले मराठा आरक्षण गेलं तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचं ते”, असं अमित शहा म्हणाले होते.
यावरून आता अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनीही शहा यांच्या विधानाला दुजोरा देत तथ्य असल्याशिवाय शहा बोलणार नाहीत, असं सूचक वक्तव्य मुंडेंनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Dhananjay Munde On Amit Shah Statement)
धनंजय मुंडे म्हणाले, असे आरोप करण्याजोगे काही तरी तथ्य असल्याशिवाय शहा बोलणार नाहीत.
मात्र, शहा बोलल्यानंतर यावर आपण बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली आहे.
दरम्यान शहांच्या टीकेवरुन प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी “मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता.
त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं. अमित शहा हे त्याच सरकारमध्ये मंत्री होते.
मात्र, हे सर्व ते विसरले असतील, त्यामुळे त्यांनी टीका केली,” असे म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या