Dhankawadi Pune Crime News | धनकवडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

Gambleing Den

पुणे: Dhankawadi Pune Crime News | धनकवडी भागातील नसरवान पेट्रोल पंपाजवळ मटका अड्डा सुरू असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत आरोपींकडून २२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Police Raid On Gambleing Den)

गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस शिपाई श्रीकांत दगडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे. त्यानंतर दहा जणांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime Branch)

याप्रकरणी अजय शिरसाठ (वय ४८, रा. धनकवडी ), किरण किसन कानकर (वय ३२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी ), गणेश कदम ( वय ३५, रा. पद्मावती), दीपक दोडे ( वय ५५, रा. बिबवेवाडी ), दादासाहेब जोगदंड (वय ३५,रा. पद्मावती ), बसू सिगली (रा. मार्केट यार्ड ), अर्जुन थोरात ( वय ४९, रा.धनकवडी), बबन कांबळे (वय ५२, रा. बिबवेवाडी ), उत्तरेश्वर साठे (वय ५५, रा. आंबेगाव ), चंद्रकांत बाड (वय ३५, रा. धनकवडी ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baba Siddique Murder | बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर मारेकरी पसार न होता लीलावती रुग्णालयातच… , पोलीस चौकशीत मोठा खुलासा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

You may have missed