Dhankawadi Pune Crime News | पुणे: मोबाईलवरील मालिका बंद केल्याने मुलाने आईला केली मारहाण ! रागाच्या भरात घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या, धनकवडीतील विचार करायला लावणारी घटना

Son Beats Mother

पुणे : Dhankawadi Pune Crime News | वडिल चालक असल्याने नेहमी बाहेर असता. घरात आई आणि तो अल्पवयीन मुलगा असे दोघेच असतात. मुलाचे मानसिक संतुलन बिघडलेले. मुलगा मोबाईलवर मालिका पहात होता. मालिका संपल्याने आईने मोबाईल बंद केला. याचा राग आल्याने त्याने आईच्या डोक्यात लाकडी फ्रेम फोडली. कात्रीने मारण्याचा प्रयत्न केला. आपल्याच आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. लोकांना विचार करायला लावणारी ही घटना धनकवडीतील मुंगळेअण्णानगरमध्ये सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली.

https://www.instagram.com/p/DBLLMeAiR2P

याबाबत ३९ वर्षाच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अल्पवयीन असून तो ९ वीत शिकत आहे. त्याच्या मनात असेल तर तो अधून मधून शाळेत जातो. मानसिक संतुुलन बिघडले असल्याने तो अनेकदा व्हायलंट होतो. यापूर्वीही त्याने आईला मारहाण केली होती.

त्यांचे पती हे चालक म्हणून नोकरी करीत असल्याने अनेकदा बाहेरगावी असतात. घरात ते दोघेच असतात. सोमवारी रात्री मुलगा मोबाईलवर मालिका पहात होता. रात्री साडेदहा च्या सुमारास मालिका संपल्याने आईने मोबाईल बंद केला. याचा राग येऊन मुलाने आईच्या डोक्यात शिवाजी महाराजाची लाकडी फ्रेम मारुन फोडली. त्यानंतर कात्रीने मारायला आला. तेव्हा आईने तो वार चुकवला. मुलाने आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. पोलीस हवालदार जाधव तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DBLJfP2Cato

मुलाने यापूर्वीही आईला मारहाण केली होती़ या प्रकारामुळे आई घाबरुन गेली़ कालचा प्रकार आपल्या जीवावर बतला असल्याचे त्यांना जाणवल्याने आईने तक्रार दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे (Sr PI Chhagan Kapse) यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DBLGPPCCCIP

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supreme Court Notice To Mahayuti Govt | ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात येणाऱ्या
मोफतच्या योजना म्हणजे लाच’, सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगासह सरकारला नोटीस

Police Inspector Suspended In Pune | पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहायक उप निरीक्षक तडकाफडकी निलंबित, जणून घ्या प्रकरण

Sharad Pawar On Ajit Pawar | ‘लाडकी बहीण’ वरून शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘बारामतीतही एक बहीण निवडणुकीला उभी होती, तेव्हा…’

Ajit Pawar NCP Leader To Mahayuti | अजित पवारांच्या नेत्याचा महायुतीला इशारा; म्हणाले – ‘मला उमेदवारी दिली नाही तर…’

You may have missed