Dhankawadi Pune Crime News | कपाटातील बॅग खाली पडून रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून मुलगा जखमी; मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाच्या घरी घडला प्रकार

pistol

पुणे : Dhankawadi Pune Crime News | सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या धनकवडी येथील बंगल्यावर काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाच्या घरी एक घटना घडली आहे. रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन ते बॅगेत कपाटात ठेवले होते. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून १३ वर्षाच्या मुलाच्या पायाला लागून तो जबर जखमी झाला आहे. (Dhankawadi Pune Crime News)

अभय शिर्के (वय १३) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन हनुमंत शिर्के (वय ४०, रा. श्री गणेश अपार्टमेंट, वनराई कॉलनी, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजता शिर्के यांच्या घरात घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिर्के हे मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी आपल्या परवाना धारी रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन कसलीही खबरदारी न घेता रिव्हॉल्व्हर असलेली बॅग कपाटात ठेवली. त्यांचा मुलगा अभय शिर्के याने कपडे घालण्यासाठी कपाट उघडले. त्याने शर्ट घातला.

त्यानंतर पँट घालत असताना धक्का लागून कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडून त्यातून गोळी सुटली. ती अभय याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागून तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे (Sr PI Chhagan Kapse) व अन्य अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील (API Sagar Patil) अधिक तपास करीत आहेत.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed