Dhankawadi Pune Crime News | भाईकडे का बघतो ! युवकाच्या डोक्यात कोयत्याने केले वार, धनकवडीतील घटना
पुणे : Dhankawadi Pune Crime News | आमच्या भाईकडे का बघतो, असे म्हणून टोळक्याने युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार (Koyta Attack) करुन गंभीर जखमी करण्यात आले. (Attempt To Kill)
यामध्ये सोहम विजय पंडित (वय १७, रा. धनकवडी) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सोहम सोनार, समर्थ गोगावले, स्वराज दारवटकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धनकवडीतील साई मेडिकल समोर बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली. (Sahakar Nagar Police Station)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा आपल्या मामाच्या गॅरेजमध्ये काम करतो. तो रात्री घरी परत जात असताना तिघे जण दुचाकीवरुन आले. त्यांनी फिर्यादीला अडवून म्हणाले की, ‘‘संकेत कसबे आमचा भाई असून तू आमच्या भाईकडे का बघतो?’’ त्यावर फिर्यादी याने संकेत कसबे कोण आहे? त्याला मी ओळखत नाही. त्यावर स्वराज दारवटकर त्याच्या मित्रांना म्हणाला की, हा काय सुधारणार नाही़ याला टाका, असे म्हणून शिवीगाळ करु लागला.
तेव्हा फिर्यादी यांनी शिवी देऊ नको, असे बोलला. त्यावर सोहम सोनार याने शर्टच्या पाठीमागे लपवून ठेवलेला कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात मारला.
त्याच्या डोक्यात जखम होऊन रक्त येऊ लागल्याने फिर्यादी मोठमोठ्याने आरडाओरडा करु लागले.
तेव्हा लोक गोळा होऊ लागल्याने तिघे दुचाकीवरुन पळून गेले.
फिर्यादीने जखमेवर उपचार केल्यानंतर फिर्याद दिली असून पोलीस हवालदार धोत्रे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन