Dharashiv Crime News | मुलीचे मागच्या वर्षीच लग्न झालं, गुढीपाडव्यासाठी माहेरी आली, आईसह विवाहित मुलीने गळफास घेत संपवलं जीवन; घटनेने परिसरात खळबळ

crime-logo

धाराशिव : Dharashiv Crime News | आईसह विवाहित मुलीने राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. रत्नमाला संजय पवार (वय-४५, रा. करंजी, ता-करमाळा, जि- सोलापूर,सध्या रा- तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रतीक्षा तुषार पाटील (वय-२३, रा- सापटणे, ता-माढा, जि.-सोलापूर) असे विवाहित मुलीचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, रत्नमाला पवार यांचे पती संजय पवार हे येथील लिट्ल फ्लॉवर्स प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते मंगळवार (दि.२५) दुपारी २ वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परतले असता ही घटना उघडकीस आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.

पवार यांचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील करंजी हे आहे. त्यांची मुलगी प्रतीक्षा हिचा मागील वर्षी विवाह झाला होता. पवार यांनी रविवारी होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणासाठी मुलीला तुळजापूर येथे आणले होते. मात्र आई आणि मुलीने गळफास लावून आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली. दोघींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच तुळजापूरचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed