Dheeraj Ghate | देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावते हीच इच्छा – धीरज घाटे (Video)

पुणे : Dheeraj Ghate | “विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) भाजपाला देदिप्यमान यश मिळवून देणारे आदरणीय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी, हीच सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची (BJP Worker) मनस्वी इच्छा आहे” असे प्रतिपादन पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले.
https://www.instagram.com/p/DC3ix8NJH7U
राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ला मतदारांनी भरभरून प्रेम दिले या मध्ये सर्वात मोठी कामगिरी ही भारतीय जनता पार्टीने केली आहे ह्या विजयाचे खरे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणविस यांचे नाव अग्रस्थानी आहे मागील सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पद देऊन त्यांना मानाचे स्थान दिले तसाच मनाचा मोठेपणा या वेळी शिंदे साहेब दाखवतील अशी आशा आहे असे घाटे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची राज्यच्या मुख्यमंत्री व्हावेत या करता आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सारसबागेतील (Sarasbaug Ganpati) सिद्धिविनायक मंदिरात होम हवन तसेच महारतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), कसब्याचे आमदार हेमंत रासने (Hemant Rasane), प्रदेशाचे प्रवक्ते संदिप खर्डेकर (Sandeep Khardekar), युवा मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, वर्षा तापकीर, राहुल भंडारे, महेश पुंडे, राजेंद्र शिळीमकर, सुशील मेंगडे, गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या
Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन