Diamond Park Lohegaon | माहेर संस्थेतील मुलांसोबत नाताळ साजरा ! लोहगाव येथील डायमंड पार्कचा अभिनव उपक्रम

Diamond Park Lohegaon

पुणे : Diamond Park Lohegaon | इतरांच्या आयुष्यात आनंद पसरवणाऱ्याचा संदेश घेऊन येणारा नाताळचा सण यंदा माहेर संस्थेतील मुलांसाठी आनंदासह भेटवस्तूंची मेजवानी घेऊन आला. पुणेकर नागरिकांनी उस्फूर्तपणे दिलेल्या भेटवस्तू संकलन करत डायमंड पार्कद्वारे त्या माहेर संस्थेतील चिमुकल्यांना देण्यात आल्या आणि या मुलांच्या आयुष्यातील नाताळचा सण अविस्मरणीय ठरला.

निमित्त होते, लोहगाव येथील डायमंड पार्कतर्फे नाताळनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे. या उपक्रमात डायमंड पार्क्सच्या कर्मचाऱ्यांनी संस्थेतील मुलांसाठी भेटवस्तू गोळा करून ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉजच्या माध्यमातून त्यांचे वाटप केले. लहान मुलांनी हा आनंद भरभरून अनुभवला. माहेरच्या मुलांनी डायमंडच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

डायमंड पार्कच्या हिलटॉप मल्टीक्युझिन रेस्टॉरंट आणि कोपा दी कोलिना येथे नाताळचा उत्सव रंगला. या उत्सवात आकर्षक खेळ, सांताक्लॉजच्या भेटवस्तू आणि विविध रंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डायमंड पार्क्सने २१ डिसेंबरपासून पाच दिवसांचा ख्रिसमस कार्निव्हल सुरू केला, ज्यामध्ये मुलांसाठी सॉफ्ट प्ले झोन, विशेष परफॉर्मन्स शो, आणि स्वादिष्ट मेन्यूचा समावेश होता.

डायमंड पार्क्स आता ३१ डिसेंबरच्या नवीन वर्षाच्या पार्टीसाठी सज्ज आहे. यात वॉटर पूल कॅम्पिंग,
धमाकेदार डान्स फ्लोअर, फटाक्यांची आतषबाजी, आणि डीजे म्युझिकसह भव्य पार्टी आयोजित केली जाणार आहे.
नवीन वर्षाच्या पार्टीसाठी 7720006622 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Diamond Park Lohegaon)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार

You may have missed