Dighi Pune Crime News | समजाविण्यास गेलेल्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; पोटात वार करुन केले गंभीर जखमी, टोळक्यावर गुन्हा दाखल

CRIME

पिंपरी : Dighi Pune Crime News | किरकोळ वादाच्या कारणावरुन मित्राला शिवीगाळ करणार्‍यास समजाविण्यास गेलेल्या तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेत सुमित ज्ञानेश्वर शिंदे (वय २७, रा. वडमुखवाडी, चºहोली) हे गंभीर जखमी झाले आहेत. दिघी पोलिसांनी महेश उपाडे (वस्ताद), त्यांचा भाऊ, यश मोहिते, दाद्या मोहिते व त्यांच्या ५ ते ६ साथीदारावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिघी येथील माऊलीनगर कॉलनीतील रोडवर बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली. (Dighi Police Station)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पूर्वी झालेल्या किरकोळ वादाचे कारणावरुन यश मोहिते हा फिर्यादीचा मित्र निलेश शिंदे याला फोन करुन शिवीगाळ करीत होता. त्यावेळी फिर्यादी त्यास समजावण्यास गेले. तेव्हा महेश उपाडे याच्या भावाने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी हातमध्ये घातल्याने वार हातावर बसला. त्यानंतर यश मोहिते याने कोयत्याने फिर्यादीच्या पोटात वार केला. महेश उपाडे याने हातातील बॅटने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली. त्याच्याबरोबर असलेल्या इतर साथीदारांनी फिर्यादीचे मित्र महेश शिंदे, सुरज घेनंद, आकाश घेनंद यांना लाथाबुक्क्यांनी तसेच बँटने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांच्या स्विफ्ट कारवर दगडे घालून तिचे नुकसान केले. हा प्रकार पाहून लोक जमले. तेव्हा त्यांनी लोकांवर कोयता व बॅट उगारुन कोणी मध्ये आला तर जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन लोक पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक भामरे तपास करीत आहेत. (Dighi Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed