Digital Media Sampadak Patrakar Sanghatana | डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी प्रतिक मोरे तर सचिवपदी संदिप जाबडे
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांच्याकडून कार्यकारणी जाहीर
रायगड : Digital Media Sampadak Patrakar Sanghatana | डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी प्रतिक मोरे (माणगाव) तर सचिवपदी संदिप जाबडे (पोलादपूर) यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी नुकतीच केली आहे.
संघटनेच्या कार्याध्यक्षपदी मिलिंद माने (महाड), उपाध्यक्षपदी रघुनाथ कडू (रोहा) खजिनदारपदी तुकाराम साळुंके (महाड), सहखजिनदारपदी अमूलकुमार जैन (अलिबाग)
सह सचिवपदी रुपेश रटाटे (रोहा) तर सदस्यपदी राकेश देशमुख (महाड), निळकंठ साने (पोलादपूर), निलेश पवार (माणगाव, रोहित शिंदे (पेण) यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्यावतीने देशातील आणि राज्यातील पहिले अधिवेशन महाबळेश्वर इथ झाले होते. तर दुसरे अधिवेशन कोल्हापूर कणेरी मठ येथे झाले होते. या दोन्ही ऐतिहासिक अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटीतपणे केलेल्या पाठपुराव्याच हे यश होत. डिजीटल पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी लढणारी ही देशातील आणि राज्यातील पहिली संघटना आहे. संघटनेची संघटनात्मक ताकद अजून बळकट करण्यासाठी रायगड जिल्हा कार्यकारणी कटिबध्द असेल, असे आश्वासन कार्यकारिणीच्या सर्वच नव नियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. (Digital Media Sampadak Patrakar Sanghatana)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण